विकास भाऊ सूर्यवंशी
"श्री विकास दत्तात्रय सूर्यवंशी" (भाऊ) यांचा जन्म १८ मे १९८६ रोजी सांगली जिल्ह्यातील खानापूर (सध्याचा कडेगाव) तालुक्यातील सहोली गाव येथे झाला.
संस्कार हा मनुष्याच्या जगण्याचा मुख्य आधार, हे जाणून त्यांच्या आई सौ. मंदाकिनी सूर्यवंशी यांनी भाऊंना उच्च संस्कार दिले. त्याचप्रमाणे शिक्षण हे मनुष्याचे आयुष्य घडवते, हे जाणून त्यांचे वडील श्री दत्तात्रय सूर्यवंशी यांनी भाऊंचे शिक्षण अगदी उत्तम रित्या पूर्ण केले.
शैक्षणिक प्रवास
- प्राथमिक शिक्षण : गावातच पूर्ण
- बी.कॉम शिक्षण : जी.ए. कॉलेज, सांगली
- एमबीए शिक्षण : एम.एस. युनिव्हर्सिटी, तामिळनाडू
शैक्षणिक कालावधीच्या दरम्यानच त्यांना सामाजिक प्रश्न व अडचणी दिसू लागल्या. युवकांमध्ये बेरोजगारी, खेडोपाडी गावे व शहरांची दुर्दशा, समाजामधील स्त्री हक्क अशा बऱ्याच समस्या त्यांनी हेरल्या आणि त्यातूनच समाजकार्याची प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्याचसोबत वडील श्री. दत्तात्रय सूर्यवंशी हे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, व सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष असल्यामुळे, लोककल्याण व समाजकार्याचा वारसा त्यांच्या रक्तामध्येच आहे असे म्हणणे योग्य ठरेल.
आपल्या वडिलांना आपले आदर्श व प्रेरणास्थान मानून, त्यांच्या कार्याचा वारसा जोपासत आज श्री विकास दत्तात्रय सूर्यवंशी, भारतीय जनता पार्टी, कडेगाव तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्याच सोबत विकास भाऊ सूर्यवंशी हे जीवनधारा उद्योग समूह, जीवनधारा पतसंस्था, जीवनधारा दूध संस्था, जीवनधारा चॅरिटेबल ट्रस्ट, जीवनधारा ग्राहक भांडार, राजवी स्टोन क्रशर, राजवी ट्रेडर्स कराड, वरदराज इंडाने गैस एजन्सी खेराडे वांगी, ओम् एंटरप्राइजेस कराड, अक्युर सॉफटेक प्रायवेट लि. पुणे या सर्व संस्थांद्वारे समाजहिताचे कार्य सतत करत आहेत.
Gallery
GET IN ONE TOUCH
........









